अन्न स्वावलंबन
गोबर गॅस मधुन निघालेली शेण स्लरी, विविध पिकांना खाद्य सेंद्रिय खत म्हणुन वापरण्यात येते. कुठल्याही प्रकारे रासायनिक खत बाहेरून आणण्याची गरज नाही . ह्या स्लरी युक्त सेंद्रिय खतावर अर्धा एकर भाजीपाला , ३ एकरमध्ये लिंबूची ३00 झाडे, १0 एकरमध्ये आवळ्याची ९८0 झाडे, १५ एकरमध्ये सागवानाची ६५00 झाडे, नर्सरी, हळद पिक, धान्य पिक, चारा पिक अशी विविध पिके सेंद्रिय पद्धतीने घेण्यात येतात , स्वावलंबन तत्वाणुसार संपुर्ण स्वनिर्मित पद्धतीने शेती व्यवसाय करण्यात येतो, ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे 3५ एकराचे जीवीत प्रतिरूप, प्रतिदर्शक, प्रक्षेत्र तयार झाले आहे. काडी कचरा व शेण ह्यांच्या माध्यमातुन गांडुळ खत करण्यात येते आणि त्याच्या उपयोग नर्सरीमध्ये, फुलझाडांना अणि भाजीपाला पिकाकरीता करण्यात येतो. स्वतःच्या शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीने तयार झालेल्या फळापासून स्वतःच्या फळ प्रक्रिया केंद्रामध्ये आवळ्यापासून आवळा लोणचे , आवळा मुरंबा ,आवळा कॅंडी, आवळा सुपारी , आवळा कंटी ,आवळा जामुन, आवळा सुपारी , आवळा चूर्ण , आवळा पावडर इत्यादी तसेच लिंबु पासून लिंबु लोणचे , लिंबु मिरची लोणचे , लिंबु उपवास लोणचे , लेमन क्रश आणि आंब्यापासून आंबा लोणचे ,आंबा चॉकलेट आणि सोयाबीन पासून सोया कॉफी इत्यादी उत्पादने तयार केली जातात